सातारा दि.15 (जिमाका): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग व तत्सम 12 पोट जातीतील गरजूंसाठी
अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी अर्ज जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (म.) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर, सामाजिक न्याय भवन, 22 अ, जुनी एम.आय.डी.सी.रोड, बॉम्बेस्टाँरंट उड्डाणपूल, सातारा येथील कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पां. भ. गिऱ्हे यांनी केले. मातंग व तत्सम 12 पोट जातीतील मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारीराधे मांग, मांग गारूडी, मांग गारोडी, मादगी व मादीगा या जातीतील लोकांना अर्ज करता येतील.
श्री गिऱ्हे म्हणाले, महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या अनुदान बीजभांडवल योजनेअंतर्गत 2020-21 या आर्थिक वर्षासाठी एकुण 40.00 लाख उदिष्टाची तरतूद आहे. यात अनुदान योजनेतर्गत 30.00 लाखांची तरतूद आहे. त्यात 300 प्रकरणे केली जातील. बीजभांडवल योजनेतंर्गत 10 लाभार्थीकरीता 10.00 लाखाचे उदिष्ट आहे. यात नवीन 10 प्रकरणे केली जातील. उक्त दोन्ही योजनांची बँक निहाय उदिष्ट जिल्हयाच्या अग्रणी बँक अधिकारी यांच्या मार्फत सातारा जिल्हयातील राष्ट्रीयकृत कार्यरत बँकांना वितरीत करण्यात आली आहेत.
विशेष घटक योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा 50 हजारपर्यत गुंतवणूक असलेल्या कर्ज प्रकरणात महामंडळाकडून अनुदान मिळते. प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 हजार रूपये यापैकी जी रक्कम कमी असेल ते अनुदान देण्यात येते. अनुदान वगळून बाकीची रक्कम बँकेचे कर्ज असते. या कर्जावर बँकेच्या दराप्रमाणे व्याज आकारणी केली जाते. कर्ज फेड 36 ते 60 मासिक हप्त्यात बँकेकडे करावी लागते.
बीजभांडवल योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा 50,001 रूपये ते 7 लाखापर्यत आहे. 50,001 ते 7 लाखापर्यतच्या मंजूर कर्ज प्रकरणात 10 हजार रूपये अनुदान वगळता उर्वरीत कर्जात 5 टक्के अर्जदारांचा सहभाग, 20 टक्के महामंडळाचे कर्ज (10 हजार रूपये अनुदानासह) व 75 टक्के बँकेची कर्ज रक्कम आहे. महामंडळाच्या कर्जाची परतफेड 4 टक्के व्याजाने महामंडळाकडे करावयाची आहे. बीज भांडवल योजनेचे केवळ 10 कर्जप्रकरणांचे उदिष्ट असल्याने दि 30 सप्टेंबर 2020 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत
वरील दोन्ही योजनेच्या लाभासाठी एका लाभार्थीस एकच कर्ज मागणी अर्ज दिला जाईल. सातारा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील गरजूंनी विहित नमुण्यातील आपला अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातुन घेवून जिल्हा कार्यालयात जमा करावेत व जास्तीत जास्त लाभार्थीनी योजनेचे लाभ घेणे बाबतचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक सातारा. श्री. गिऱ्हे यांनी केले.