आसू – राज्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी आणि गुन्हेसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाने फॉरेन्सिक सायन्स क्षेत्रातील तज्ञ मनुष्यबळ तयार करणे हा उद्देश ठेवून 2009 मधे मुंबई व औरंगाबाद तसेच 2011 मधे नागपूर येथे शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्था सुरु केल्या आहेत.
जटिल गुन्हे तपास करण्यासाठी फोरेंसिक सायन्स ही काळाची गरज आहे या मधे वैज्ञानिक दृष्टिकोण ठेवून तपास व पंचनामा कसा करावा पुरावे कसे गोळा करावे याचे प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाते.परंतु आज प्रशिक्षित विद्यार्थ्यांना बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे.फॉरेन्सिक सायन्स शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी निर्माण व्हाव्या तसेच संबंधित विभागांमध्ये सदर विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम मिळावा अशा त्यांच्या विविध मागण्यांसाठी ८ सप्टेंबर २०२० रोजी मुंबई विद्यापीठाच्या फॉरेन्सिक यूनिट चे अध्यक्ष प्रसाद गायकवाड यांनी मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी कोंग्रेस चे अध्यक्ष मा.श्री अॅड.अमोल मातेले साहेब यांना निवेदन दिले. त्यांनी लगेच सगळ्या समस्या जाणून घेऊन त्या विषयाचा पाठपुरावा करीत. ९ सप्टेंबर २०२० रोजी सदर प्रश्न खा. सुप्रियाताई यांना सांगितला ,या आधी ताईंना ह्या विषया ची कल्पना विद्यार्थ्यांनी निवेदना द्वारे दिली होती तसेच माजी मुख्यमंत्री यांचे कडे ताईंनी तशी मागणी देखील केली होती. त्यामुळे विषयाचे गांभीर्य समजून त्यांनी लगेच या सर्वांची गृहमंत्री मा. अनिलजी देशमुख यांच्याशी भेट करुण दिली. आणि प्रश्न लवकर मार्गी लावावा अशी विनंती देखील केली.
त्यावेळी गृहमंत्र्यानी सदर समस्येबाबत विद्यार्थी सतत पाठपुरावा करीत आहेत आणि हा प्रश्न आता ते वेगाने मार्गी लावतील असे सांगितले. शासन या बाबतीमध्ये गंभीर असून लवकरात लवकर निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आंनदाचे वातावरण असून सर्व जण शासन निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शासनाचा हा निर्णय न्यायव्यवस्थेला वैज्ञानिक दृष्ट्या मजबूत करून समाजामध्ये समान न्याय प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत लाभदायी ठरेल असे सांगण्यात येत आहे. अॅड.अमोल मातेले साहेब आता या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहेत. यावेळी आमदार रोहित दादा पवार,आमदार सरोज अहिरे मॅडम , आमदार निलेश लंके साहेब, मुंबई अध्यक्ष ऍड. अमोल मातेले साहेब , मुंबई सरचिटणीस अमोल हिरे साहेब, मुंबई विद्यापीठाच्या फॉरेन्सिक यूनिट चे अध्यक्ष प्रसाद गायकवाड़ व सहकारी अक्षय दरने आदि उपस्थित होते.
फॉरेन्सिक सायन्सचे शिक्षण घेणाऱ्या विद्यांर्थीसाठी रोजगार संधी उपल्बध झाल्या पाहिजेत.