बारामती: लॉकडाऊन च्या काळात घरबसल्या कोरोना विषयी सर्व काही शास्त्रीय माहिती मिळावी,बारामती मधील रुग्णालये कोणती,मधुमेह,रक्तदाब,अस्थमा, किडनी,शवसन विकार रुग्णांनी सर्वात जास्त काळजी घ्यावी कशी घ्यावी,घरी उपचार कसे करावेत,सर्व साधारण दक्षता,लक्षणे व कोरोना होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी व डॉक्टराचे मोबाइल नंबर व रुग्णालयाचे नंबर व पत्ते आदी सर्व माहिती नागरिकांना उपलब्ध होणे साठी “कोरोना बाबत भीती व गैरसमज” या पत्रकाचे मोफत वाटप देसाई इस्टेट मध्ये श्री गणेश तरुण मंडळ व राजे छत्रपती प्रतिष्ठान च्या वतीने घरोघरी वाटप करण्यात आले.
या प्रसंगी न्यू शिवक्रांती युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष हेमंत भाऊ नवसारे,श्री गणेश तरुण मंडळ चे अध्यक्ष अनिल खंडाळे,साहिल शेख,यश बामणे,सुरज शिंदे,करणं भोसले,दीपक गायकवाड,नितीन जाधव,अक्षय जराड, गणेश देसाई,भैया खंडागळे,सुनील कदम आदी मान्यवर उपस्तीत होते.
“कोरोना रुग्णाची संख्या वाढत असताना नागरिकांनी काळजी घ्यावी व कोरोना विषयी असलेले समज व गैरसमज दूर व्याहवेत ,कोरोना होऊ नये म्हणून काळजी घ्यावी व ज्यांना कोरोना झाला आहे त्यांच्या कडे
तुछतेणे न पाहता सहकार्य करावे आदी उद्देशाने सदर पत्रके माहिती साठी घरोघरी वाटप करत असल्याचे” हेमंत नवसारे यांनी सांगितले.
“यापूर्वी लॉक डाऊन च्या काळात नागरिकांना मोफत भाजीपाला,जीवनावश्यक वस्तू,मास्क,सॅनिटायझर वाटप केले आहे आता खरी गरज न भिता कोरोनाशी सामना करावयाचा आहे त्यामुळे कोरोना विषयक पत्रके उपयोगी पडतील अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते साहिल शेख यांनी सांगितली.