बारामती: माळेगाव फेस्टिव्हल च्या माध्यमातून महिलांच्या कला गुणांना वाव भेटावा या उद्देशाने गौरी व गणपती आरास स्पर्धे चे आयोजन करण्यात आले होते या मध्ये कोरोना विषयक जनजागृती या विषयावर सर्वात जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
उत्कृष्ट पर्यावरण पूरक गणपती आरास स्पर्धा विजेते 1) स्नेहलता माने (बारामती) 2) मोहिनी जोंधळे (वाळकी) 3) सिद्दी वाघमोडे (माळेगाव बु)
उत्कृष्ट पर्यावरण पूरक गौरी आरास स्पर्धा विजेते
1) वर्षा रवींद्र थोरात व गीतांजली संतोष थोरात
2) सारिका कैलास तावरे (सांगवी)
3) वैष्णवी हनुमंत चव्हाण (फलटण) व मनीषा किशोर काळे (माळेगाव बु)
उतेजणार्थ
राजश्री प्रकाश धुमाळ (माळेगाव बु),दीपाली तुषार तावरे (सांगवी),अनुराधा माने (सातारा) , पूजा अजित जगताप, प्रियांका पोपट जगताप, शुभांगी श्रीकांत पवार
याना सन्मानित करण्यात आले.
“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच आशा प्रकारे ऑनलाइन स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते तरीही महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला व मास्क वापरा,सॅनिटायझर चा वापर करा,सोशल डिस्टन्स पाळा आदी बाबत जनजागृती करताना कोरोना होऊ नये व कोरोना झाल्यास घ्यावयाची काळजी या विषयावर सुद्धा उत्कृष्ट देखावे व आरास महिलांनी सादर केले व पर्यावरण पूरक देखावे सादर करून झाडे लावा,झाडे जगवा आदी विषयावर सुद्धा देखावे सादर केल्याने सामाजिक भान व जाण जपत सदर स्पर्धा यशस्वी झाल्याचे”
माळेगाव फेस्टिव्हल च्या आयोजिका धनश्री काळे,प्राची तावरे,क्षितिजा जगताप यांनी सांगितले.
Post Views: 25