फलटण दि. ९ : शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक , मानसिक , बौद्धिक , सामाजिक विकासासाठी , व शिक्षण घेण्यास सक्षम होण्यासाठी, सदृढ समाज निर्मिती, बलशाही भारतासाठी ,देशाच्या आर्थिक प्रगती साठी, आँलिम्पिंक मधील पदके वाढविण्यासाठी आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ” आरोग्य व शारीरिक शिक्षण ” विषयाची अत्यावश्यक गरज झालेली आहे, हे संपूर्ण जग कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर “आरोग्य ” या घटकावर अनुभव घेत आहे , म्हणून “आरोग्य व शारीरिक शिक्षण ” आणि शारीरिक शिक्षण शिक्षक यांच्या साठी “ दिल्ली पँटर्न” महाराष्ट्रात राबविल्यास वरील वरील ध्येय पुर्ती होऊ शकते.
१) दिल्ली प्रमाणे प्राथमिक स्तरावर पुर्ण वेळ physical education Teacher (B.P.Ed ) आल्यास महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शाळा ( जिल्हा परिषद) सह सर्व नगर पालिका शाळा , महानगर पालिका शाळा मध्ये P.E.Teachers यांची दिल्लीत 423 पदे आहेत तर महाराष्ट्राच्या लोकसंख्या व शाळा यांचा विचार करता आकडा प्रचंड मोठा होऊ शकतो.
२) माध्यमिक स्तर – ( B.P.Ed. ) – “शाळा तेथे शारीरिक शि. शिक्षक” आणि २५० विद्यार्थी पाठीमागे एक.शि. शि. शिक्षक सह इतर प्रमुख मागण्या … यशस्वी झाल्यास जारात पदनिर्मिती तयार होतात.
३) उच्च माध्यमिक स्तर – (M.P.Ed) किमान ५०० विद्यार्थी व तासिका वाढ झाल्यास येथेही पदनिर्मिती होऊ होतात.
परंतु वरील ध्येय व उद्दिष्टे पुर्ण करण्यासाठी अभ्यासपुर्ण मांडणी , सतत पाठपुरावा , सर्व शा. शि.शिक्षक संघटना यांची एकत्र ताकद यांची आवश्यकता आहे ,
आता साद …शारीरिक शिक्षण विषय वाचवण्यासाठी. वाढविण्यासाठी ….
मोठ्या संख्येने एकत्र या. विजयाचे साक्षीदार व्हा असे आव्हान महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे श्री . संदिप मनोरे सर यांनी केला आहे .