फलटण दि.5 महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालय ,मुंबई यांचेमार्फत दहावीनंतर प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेशासाठी चे अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी आता अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2020 केली आहे. फलटण एज्युकेशन सोसायटीचे, कॉलेज ऑफ इंजिनीरिंग फलटण येथे तंत्रशिक्षण संचालनालयाचे सुविधा केंद्र FC 6766आहे. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी येथे जाऊन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी असे आवाहन तंत्रशिक्षण संचालनालयाने केले आहे.
इयत्ता अकरावी व बारावी पेक्षा कमी खर्च असलेले तसेच सर्वाधिक संधी उपलब्ध असणारे डिप्लोमा हे एक करियर चे क्षेत्र आहे. दहावी नंतरच्या अभ्यासक्रमाबाबतच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेची माहिती महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉक्टर अभय वाघ यांनी मुलाखतीद्वारे दिली आहे, ही मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/QSGYvbfnoOU
तरी सर्व विद्यार्थी व संबंधित पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अजय देशमुख सर यांनी केले आहे.