महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती संदर्भात येणाऱ्या अडचणींचे महाविद्यालयांनी निराकरण करण्याचे आवाहन

सातारा दि.2 (जिमाका):  महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांचे तसेच महाविद्यालयांचे पहिला हप्ता किंवा दुसरा हप्ता किंवा दोन्ही हप्त्यातील अर्ज मंजुर होऊन देखील देय असलेल्या शिष्यवृत्ती रक्कम अद्यापही संबंधित लाभार्थी किंवा महाविद्यालयाच्या बँक खात्यात होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय देयक जनरेट झालेल्या अर्जांपैकी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीचे वितरण सद्यस्थितीत महाडीबीटी प्रणालीवरील pool account व PFMS या प्रमणालीद्वारे चालू असून सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम आधार संलग्न बँक खात्यात अद्याप जमा व्हायची आहे, शिष्यवृत्तीची रक्कम पीएफएमएस प्रणालीद्वारे वितरीत खालील कारणांमुळे विलंब होत आहे.

नॉन आधार अर्ज नोंदणी केलेल्या अर्जामध्ये आधारक्रमांक अदयावत नसणे. विदयार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी संलग्न नसणे. विदयार्थ्यांचे आधार क्रमांक इनअॅक्टिव असणे. विदयार्थ्यांचे व्हाऊचर रिडीम न करणे.विदयार्थ्यांचे आधार संलग्न असलेले बँकेतील खाते बंद करणे. विदयार्थ्यांचे आधार संलग्न मोबाईल क्रमांक बंद असणे.दुसऱ्या हप्त्यासाठी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांची उपस्थिती अद्यावत करण्यासाठी अर्ज प्रलंबित असणे.

वरिल सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या आधार बँक खात्याशी निगडीत असून त्या त्यांच्या स्तरावरून जसे जसे अदयावत केले

जाईल. त्याप्रमाणे विदयार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्क्म त्यांच्या बँक त्यांच्या बँक खात्यामध्ये आपोआप जमा होणार असल्याचे महाडीबीटी पोर्टलचे तांत्रिक कक्ष व राज्य शासनाचे माहीती व तंत्रज्ञान संचलनालय यांनी शासनास कळविले आहे.याची नोंद सर्व महाविदयालयांनी घेणेत यावी व सदर त्रुटींची पुर्तता करणेसंदर्भात आवाहन आपआपल्या महाविदयालयातील सर्व विदयार्थ्यांना

कळविणेत यावे, असे समाज कल्याण विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!