सातारा दि.2 (जिमाका): निरीक्षक वैधमापन शास्त्र कराड पहिला विभागाच्या तपासणी पथकाने 1 एप्रिल ते 21 ऑगस्ट या कालवधीत विविध नियमान्वये दोषी आढळलेल्या 26 आस्थापनांकडून 4 लाख 17 हजार 900 रुपये प्रशमन शुल्क जमा केला आहे.
या तपासणी मोहिमेत वैधमापनशास्त्र निरीक्षक ल.उ. कुटे क्षेत्र, सहायक च.रा. जाधव, ए.य. कदम हे सहभागी झाले होते. ही तपासणी मोहिम यापुढेही अशीचा चालू राहणार आहे. ग्राहकांच्या काही तक्रारी असल्यास 9403702767 संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000