बारामती: सोशल मीडिया च्या माध्यमातून जण जागृती करून नागरिकांना श्री गणेश मूर्ती चे विसर्जन करण्यासाठी आव्हान करून नगरपरिषद व पोलीस प्रशासनास सहकार्य करून गणेश विसर्जन वेळेत व शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करणारे देसाई इस्टेट मधील श्री गणेश तरुण मंडळ व श्री राजे छत्रपती प्रतिष्ठान चे कार्य कौतुकास्पद असल्याचे शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले.
देसाई इस्टेट मधील नगरपरिषद च्या कृत्रिम जलकुंडा ची पाहणी करण्यासाठी बारामती नगरपरिषद चे मुख्यधिकारी किरणराज यादव व पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील,सहायक पोलिस निरीक्षक पदमराज गंपले व इतर अधिकारी कर्मचारी यांनी भेट दिली या प्रसंगी त्यांनी दोन्ही मंडळांनी केलेले कार्याचे कौतुक करून दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांना शाबासकी दिली.या वेळी स्थानिक नगरसेवक अतुलजी बालगुडे,हेमंत भाऊ नवसारे,राहुल वायसे,निलेश पवार, नीरज देसाई,,साहिल शेख, संग्राम खंडांगळे,महेश कोडलिंगे,अनिल खंडाळे, प्रकाश गजाकस,यश बामणे,सुरज शिंदे,सुनील कदम,सुरज शिंदे,आदी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
देसाई इस्टेट मधील सर्वांच्या वतीने पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील व मुख्यधिकारी किरणराज यादव यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला.स्थानिक नगरसेवक अतुल बालगुडे यांनी आभार व्यक्त केले.