नायगाव येथे मुद्रा महिला बचत गट संचलित घरगुती जेवण व अल्पोहार केंद्राचे उदघाटन संपन्न

मुद्रा महिला बचत गटाच्या घरगुती जेवण व अल्पोहार केंद्राचे उदघाटन करताना सहकार क्षेत्रातील समाजसेवक अनिल मोरे साहेब सोबत मुंबई काँग्रेस सचिव महेंद्र मुंगणेकर साहेब रोजगार स्व.रो.चे मुंबई काँग्रेस सचिव प्रसन्न नांगावकर साहेब मुद्रा महिला बचत गटाच्या संस्थापक अध्यक्षा सौ.ज्योती मनोज माने खजिनदार सौ.शोभा कांबळे सदस्या सुजाता धनावडे)

मुंबई : नायगाव विभागातील पोलिस हेडकाँटर जवळ नांयगाव मधील सर्वसामान्य नागरिकांना व पोलिस बांधवाना परवडेल अशा वाजवी दरात अनघा पोळी भाजी केंद्र व मुद्रा महिला बचत गट संचलित घरगुती जेवण व अल्पोहार केंद्राचे उदघाटन मुंबई काँग्रेसचे सचिव महेंद्र मुंगणेकर साहेबांच्या हस्ते झाले .स्टाँलची फित कापून सहकार क्षेत्रातील समाजसेवक अनिल मोरे साहेबांनी बचत गटाला शुभेच्छा दिल्या.प्रमुख पाहूणे रोजगार स्वयंमरोजगार मुंबई काँग्रेसचे सचिव प्रसन्न नांगावकर साहेब उपस्थित होते.तसेच मुद्रा महिला बचत गटाच्या संस्थापक अध्यक्षा सौ.ज्योती मनोज माने खजिनदार सौ.शोभा कांबळे सदस्या सौ.सुजाता धनावडे तसेच अनघा संस्थेचे संचालक दिलीप परुळेकर संचालक प्रशांत माने तसेच सातारा जिल्हा विकास समिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मनोज माने उपस्थित होते.विभागातील नागरिकांनकडून पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!