फलटण : जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनलच्या फेडरेशन सप्ताहा निमित्त *जैन सोशल, ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन यांच्या सहकार्याने *जलधारा* योजने अंतर्गत *जैन सोशल, ग्रुप* फलटण मार्फत फलटण नगरपरिषद हद्दीतील *शनिनगर* येथे बोअरवेल घेण्यात आले असुन, याचा शुभारंभ शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १२:१५ वाजता करण्यात आला, यावेळी जैन सोशल ग्रुप फलटणचे अध्यक्ष डॉ.संतोष गांधी, सचिव डॉ.ऋषिकेश राजवैद्य, खजिनदार श्री.श्रीपाल जैन आणि या प्रोजेक्टचे चेअरमन श्री.मंगेश दोशी , प्रभागातील नगरसेवक श्री.किशोरसिंह नानासाहेब नाईक निंबाळकर, नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे, श्री.अभिजीत जानकर व परिसरातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.