बारामती : बारामती तालुक्यातील सिद्धेवर निबोडी येथे महात्मा फुले कृषी विदयापीठ राहुरी संचालित श्रीराम उदयानविद्या महाविदयालय पाणीव जिल्हा सोलापूर यांचे संयुक्त मार्गदर्शनाखाली ग्रामीण
उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बारामती
तालुक्यातील सिध्देश्वर निंबोडी येथे वृक्षारोपन करण्यात आले. यामध्ये वेगवेगळ्या जातीची वृक्ष,
लागवड करण्यातआल्याची माहिती प्रशिक्षणार्थी
प्रियंका शिवाजी बाड योनी दिली
सातव्या सत्रातील विद्याधींना त्यांच्या गावामध्ये १ जुलै ते 30 ऑक्टोबर या कालावधीत शेतक-यांसाठी
प्रशिक्षण शिबीर शेती संवर्धन याविषयी माहीती देन्यात येत असुन या कार्यक्रमाचा एक भान
कृषिकन्या कु. प्रियंका शिवाजी बाड हिने गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पूर्ण केला. यावेळी
सरपंच मनिषा फडतरे, तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते यासाठी प्रा. ए. एन कोळेकर,
प्रा. तुकाराम बोडके, प्रा. विश्वास केकान. प्रा. ए. एस.फुटाने, प्रा. महेश चहान. पा. दत्तात्तय राऊन.
प्रा. संदेश घोरपडे, डी.ए. ढेरे व
उद्यान विद्या महाविदयालयाचे प्राचार्य प्रा. पी टी को कोळेकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.माजी सरपंच किशोर फडतरे यांनी आभार व्यक्त केले