सातारा दि. 11 ( जि. मा. का) : कोयना धरणात आज 70.20 टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 70.12 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 45 नवजा येथे 72 व महाबळेश्वर येथे 59 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम – 7.10 (60.71), धोम -बलकवडी- 3.34 (84.33), कण्हेर – 6.98 (72.75), उरमोडी – 8.17 (84.60), तारळी- 4.07 (69.63), निरा-देवघर 6.46 (55.09), भाटघर- 15.97 (67.96), वीर – 8.58 (91.20).
गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण सरासरी 19.74 मि.मी. पाऊस
सातारा, दि. 11 ( जिमाका ) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 19.74 मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा 20.72 (509.00) मि. मी., जावली – 25.55 (895.89) मि.मी. पाटण – 28.73 (854.63) मि.मी. कराड – 13.23 (398.38) मि.मी., कोरेगाव – 20.78 (351.94) मि.मी. खटाव – 14.52 (306.55) मि.मी. माण – 13.71 (277.86) मि.मी., फलटण – 10.22 (267.62) मि.मी. खंडाळा – 17.65 (310.95) मि.मी. वाई – 11.86 (483.40) मि.मी. महाबळेश्वर – 61.78 (3076.76) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 7732.98 मि.मी. तर सरासरी. 703.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.