बारामती: कोरोना च्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. ७ ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सरचिटणीस सौ.रोहिणी खरसे (आटोळे) यांचे वतीने बारामती तालुक्यातील गुणवाडी येथील तृतीयपंथी बांधवांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. ” समाजातील अशा बांधवाना कोरोनाच्या काळामध्ये खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे व त्यातच लॉकडाऊन असल्यामुळे रोजगार बुडाला आहे. तसेच आपण ही समाजातील अश्या लोकांना काही तरी मदत केली पाहिजेल या भावनेतून आज ही छोटीसी मदत करण्यात आली आहे गरजेनुसार आणखीन मदत करणार असल्यासाचे रोहिणी खरसे यांनी सांगितले.
फोटो ओळ: जीवनावश्यक वस्तू चे किट वाटप करताना रोहिणी खरसे