सातारा दि. 5 (जि. मा. का) : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाच्या स्वच्छता कामगारांना ड्रेनेजची स्वच्छता करताना टॉयलेटमध्ये दोन मानवी भ्रुण मृतावस्थतेत सापडल्याची बातमी वृत्तपत्रांतून प्रसिध्द झाली आहे. या अतिसंवेदनशनील बाबीची सविस्तर चौकशी होणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी चौकशी समितीची तात्काळ नियुक्ती केली असून 14 ऑगस्ट पूर्वी चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या चौकशी समितीमध्ये जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, महिला व बालविकास अधिकारी मनोज ससे, क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालयाच्या विधी अधिकारी पुनम साळुंखे यांचा समावेश आहे.