सातारा दि. 6 (जि. मा. का) : माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवांच्या पाल्यांना केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत शैक्षणिक आर्थिक मदत दिली जाते. या मदतीसाठी 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. शैक्षणिक आर्थिक मदतीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील यांनी केले आहे.
0000