बारामती: बुधवार 5 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा संकुल देसाई इस्टेटमधील मुख्य क्रीडा संकुल व वसतिगृह दुरुस्ती व रंग रंगोटीच्या कामाच्या शुभारंभ उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अधीक्षक हनुमंत पाटील ,जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य व बारामती नगर परिषदेचे गटनेता सचिन सातव,बारामतीचे पाहिले आयर्न मॅन सतीश ननावरे,प्रसिद्ध क्रिकेटपटू धीरज जाधव,प्रो कब्बडी खेळाडू दादासो आव्हाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी
बारामती तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे,पुणे जिल्हा क्रीडा ऑफिसचे क्रीडा अधिकारी राजेंद्र देवकाते,शिवाजी कोळी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्वास ओव्हळ,उदयसिंग नंदखिले,ओम साई एंटरप्राइजेस चे कॉन्टॅरक्टर अमोल पाटील,अविनाश बांदल,इंजिनीयर गणेश मोकळे,निलेश जायपत्रे,कराटे मार्गदर्शक रविंद्र करळे,अभिमन्यू इंगुले,आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बारामती तालुक्याचे क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी जिल्हा क्रीडा संकुलमध्ये गेल्या ३ महिन्यामध्ये केलेल्या लाईटची,लॉन टेनिस,स्वच्छता इत्यादी कामाचा अहवाल यावेळी सांगितला व यापुढेही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अशीच कामे पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांच्या नेतृत्वाखाली करत राहू असे आपल्या प्रस्तावनेत सांगितले आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री हनुमंत पाटील यांनी संकुल हा खेळाडूंचा जिव्हाळ्याचा विषय असून कामाचा दर्जा चांगला ठेवा .जिल्हा क्रीडा अधिकारी श्री विजय संतान यांनी संकुलमध्ये चालू असणाऱ्या कामाबाबत समाधान व्यक्त करतानाच संकुलमध्ये आणखी सुधारण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबीची पूर्तता करणेसाठी प्रस्ताव तयार करणे बाबत तालुका क्रीडा अधिकारी यांना सूचित केले.रविंद्र करळे यांनी आभार मानले.
फोटो ओळ भूमिपूजन करताना हनुमंत पाटील व इतर (छाया अनिल सावळेपाटील)