फलटण : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै.श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त मंगळवार दिनांक ४ ऑगस्ट २०२० रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाचे पालन करत श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी कार्यकर्त्यांना कार्यक्रमाचे आयोजन करण्यास सांगितले होते . त्यानुसार कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते . कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रशस्त असा चबुतरा तयार करून त्या ठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती व कै. श्रीमंत दादाराजे यांचा त्या ठिकाणी फोटो ठेवण्यात आला होता सकाळी श्रीमंत शिवरूपराजे यांनी फोटोला विधिवत पूजाअर्चा केली. यावेळी स्वयंशिस्तीने कार्यकर्त्यांनी व इतर लोकांनी त्या ठिकाणी कै. श्रीमंत दादाराजे यांच्या प्रतिमेचे पुष्प अर्पण करून दर्शन घेतले .
यावेळी पंचक्रोशीतील काही मंडळी उपस्थित होती त्यावेळेस कै.श्रीमंत दादाराजे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला त्यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की आपल्या उत्कट समाजकार्याच्या जोरावर त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता . तसेच जनसामान्य लोकांना आपलं माननारा व आपलंस वाटणारे नेते होते व सहकाराची जाण व अभ्यास असणारा आसा नेता आपल्यातून गेल्याची भावाना व्यक्त केल्या . तसेच यावेळी काही मान्यवरांनी सदिच्छा भेट दिल्या त्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले , व्हा. चेअरमन सुनिल माने , संचालक मंडळ व पदाधिकारी, त्याच प्रमाणे फलटण पंचायत समितीच्या बीडीओ , फलटण पंचायत समितीचे सदस्य व पदाधिकारी तसेच फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजी माजी सदस्य व कै. श्रीमंत दादाराजे यांचे बन्धू श्रीमंत राजसिंहराजे ( बंटीराजे ) खर्डेकर आदींच्या उपस्थितीत पार पाडला .