सांगवी येथे सहकार महर्षी पदमश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी दिन उत्साहात साजरा

फलटण : सांगवी(ता.फलटण)येथे सहकार महर्षी पदमश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी दिन उत्साहात साजरा करण्यात आला, अध्यक्ष स्थानी सांगवी गावच्या सरपंच मा.सौ.शर्मिलाताई सुरेश जगताप, होत्या.श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा.पोपटराव जाधव, लायन्स क्लब फलटण चे उपाध्यक्ष डॉ. तुषार गायकवाड यांची विषेश ऊपस्थीती होती.या प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी अमोल सपकाळ यांनी पदमश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याचा आढावा देताना सांगीतले की त्यांनी देश अतिशय प्रतिकृल परिस्थीत सहकार क्षेत्रामध्ये आणि शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य विषेश उल्लेखनिय असून समस्त भारत देशातील शेतकऱ्यांना आणि शेती क्षेत्राला प्रेरणादायी ठरले आहे, तसेच शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदानही मोठे आहे.यामुळेच आजचा नारळी पौर्णिमेचा त्यांचा जन्मदिन ‘शेतकरी दिन’ म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने साजरा केला जातो.

कृषी सहायक योगेश भोंगळे, यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कृषी पर्यवेक्षक राजेंद्र पालवे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती सांगितली. यावेळी कृषि सहायक चंद्रकांत मंडलिक, संजय गायकवाड,कृषी महाविद्यालय पुणे,तसेच कृषि महाविदयालय, मुळदे येथील ग्रामिण कृषि कार्यानुभव योजनेच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच प्रगतीशील शेतकरी दत्तात्रय घोरपडे, जालींदर कुंभार,संजय विरकर रामचंद्र मोरे, दिलीप सस्ते,आदि शेतकरी मोठया संखेने उपस्थित होते.
प्रगतीशील शेतकरी पोपटराव गायकवाड गुरूजी यांनी सुत्रसंचालन केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!