फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक नितीन सावंत यांना निवेदन देताना भारतीय जनता पार्टीचे बजरंग गावडे व कार्यकर्ते
आसू- फलटण तालुक्यातील गोखळी पाटी याठिकाणी दूध दरवाढीसाठी त्याचबरोबर दुधाला अनुदान मिळण्या बाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्य शासनाचा निषेध करत आंदोलन करण्यात आले.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख फलटण बजरंग गावडे,उपाध्यक्ष पिंटू जगताप यांच्या नेतृत्वाखाली गोखळी पाटी याठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दूध दरवाढ व अनुदान मिळणे बाबत आंदोलन करून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक नितीन सावंत यांना निवेदन दिले.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ मिळालीच पाहिजे तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला १० रुपये अनुदान व दूध पावडरवर ५० रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मिळालेच पाहिजे या संदर्भात आंदोलन केले. या विषयी शासनाने वेळीच योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभारले जाईल असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे बजरंग गावडे यांनी केले.
–