फलटण : फलटण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य विकास करण्यासाठी कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी महाविद्यालयाच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय देशमुख यांनी दिली.
‘केंद्रीय जल व उर्जा संशोधन केंद्र,पुणे’ या संस्थेमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग विभागांमधील ३२ विद्यार्थ्यांची, तर कम्प्युटर इंजिनीअरिंग विभागातील ३३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या संस्थेचे डॉ. एम.सेल्वा बालन यांच्या मार्गदर्शनाखाली, या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व संशोधन करण्याची संधी मिळाली आहे. पुरामुळे होणारी जिवीत व वित्त हाणी बाबतीत वेळीच उपाययोजना करुन, प्रगत तंत्रज्ञान वापरून कमी करू शकतो. पुरासह पाण्याच्या प्रवाहाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अभ्यास करण्यासाठी ही भारत सरकार द्वारा संचलित संस्था काम करते.
‘फोर्ब्ज मार्शल’ कंपनीमध्ये ‘मेकॅनिकल’ व ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन’ विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. स्टिम इंजिनिअरिंग व इंस्ट्रुमेंटेशन व ऑटोमेशन इंजिनिअरिंग मध्ये काम करणाऱ्या या कंपनीने सुद्धा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले आहे.
आँनलाईन प्रशिक्षण व सर्टीफिकेशन करणारी ‘सिंपली लर्न’ या संस्थेमध्ये तृतीय वर्ष डिग्री इंजिनिअरिंग मधील सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ‘कमिन्स’ कंपनी च्या माध्यमातून हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रायोजित करण्यात आला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यामध्ये ‘इंडस्ट्री रेडीनेस’ वाढण्यासाठी हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
‘स्पोकन ट्युटोरिअल,’ ‘आय.आय.टी बाम्बे’ यांच्या माध्यमातून विविध साफ्टवेअर कोर्सेस, द्वितीय वर्ष डिग्री इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येत आहे.
‘इलेक्ट्रॉनिक्स सहकारी सोसायटी, पुणे’ चेअरमन तथा ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे’ चे विश्वस्त ‘श्री. अशोक सराफ’ यांच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कमी वेळेमध्ये हॉस्पिटल बांधकाम करण्यास लागणारे नियोजन, डिझाईन, उपकरणे याबाबत ची इंटर्नशिप मिळाली आहे. विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांना कन्सलटंट म्हणुन काम करनारे ‘श्री. अशोक सराफ’ यांच्या ज्ञानकौशल्यांचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे.
अभियांत्रिकीचे उत्तम शिक्षण देत असताना विद्यार्थ्यांची तांत्रिक कौशल्य विकसित करुन कंपन्या मध्ये काम करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी व कंपनी व महाविद्यालयीन अभ्यासक्रम यातील समतोल राखण्यासाठी अशा प्रकारच्या इंटर्नशिप अत्यंत उपयोगी ठरणात, किंबहुना आज ती काळाची गरज बनली आहे. ही गोष्ट ओळखुन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रथम वर्षांपासूनच अशा संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत जेणेकरून जागतिक स्तरावरचे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना या माध्यमातून अभ्यासता येईल.