बारामती-शुक्रवार दिनांक ३१ जुलै रोजी बारामतीचे पाहिले व प्रसिद्ध आयर्न मॅन श्री.सतिश ननावरे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ते बारामती असे ११० किलोमीटर अंतर नॉनस्टॉप 12 तासात पूर्ण केले व करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये स्वतच्या आरोग्याकरिता व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केल्याबद्दल क्रीडा विभागाच्या बारामतीमधील
जिल्हा क्रीडा संकुल येथे श्री.सतीश ननावरे यांचा तालुका क्रीडा अधिकारी श्री जगन्नाथ लकडे यांच्या हस्ते व प्रो कब्बडी खेळाडू दादासो आव्हाड,अजिनाथ खाडे,कराटे मार्गदर्शक रविंद्र करळे,अभिमन्यू इंगुले यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी तालुका क्रीडा अधिकारी श्री.जगन्नाथ लकडे यांनी बारामती तालुक्यातील सर्व खेळातील उत्कृष्ठ खेळाडू निवडून त्यांच्यासाठी त्या त्या खेळाचे तज्ञ व अनुभवी प्रशिक्षक नेमून त्याखेळाडूना विविध कंपन्या,संस्था,दानशूर यांनी पुढाकार घेऊन गुणवान खेळाडूंना आर्थिक सहकार्य करण्यास पुढे यावे व माजी खेळाडूंनी आपापल्या परिसरातील विद्यार्थ्यांना मैदानावर आणावे व प्रशिक्षण द्यावे त्यातूनच आंतरराष्ट्रीय खेळाडू बारामतीतून घडतील असे प्रतिपादन केले व त्यावेळी आयर्न मॅन श्री.सतीश ननावरे यांनी देखील खेळाडूंना आवश्यक असे मार्गदर्शकाबरोबर आहारतज्ञ, फिजिओथेरपीस्ट,खेळाडू करीता असणारे मानसोपचार तज्ञ अशी सर्व तज्ज्ञांच्या सहकार्यने खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मदत होऊ शकते असे या चर्चेदरम्यान सांगितले त्याकरिता बारामतीच्या सर्व स्तरावरील क्रीडाप्रेमी कडून देखील काही चांगल्या सुचना असल्यास त्यादेखील घ्याव्यात व योग्य ती सुविधा द्यावी असे सांगितले