फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित येथील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज,जाधववाडी फलटण मधून इयत्ता १० वी परीक्षेस बसलेले सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकीप ५० विद्यार्थी विशेष प्राविण्यात, २३ प्रथम श्रेणीत, ४ द्वितीय श्रेणीत विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत. विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (ssc ) ॲण्ड ज्युनिअर कॉलेज,जाधववाडी फलटण एसएससी बोर्डाचा निकाल शंभर टक्के
विद्यालयातील कु.बेलदार सृष्टी रविंद्र ९५.२०% गुण मिळवून विद्यालयात प्रथम, कु. रणवरे साक्षी अमरसिंह ९५.००% गुण मिळवून व्दितीय आणि कु.ननवरे कन्हैया बाळासाहेब ९४.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. प्रशालेतील कु.शहा रिया विशाल ९४.२०% गुण मिळविले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे व त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षकांचे फलटण एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष तथा महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ चेअरमन तथा बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी सेक्रेटरी तथा महाराष्ट्र खो खो असोसिएशन अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, अधिक्षक श्रीकांत फडतरे, प्रशाळेच्या प्राचार्या सौ.संध्या फाळके, परिवेक्षक एम.पी.निंबाळकर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.