फलटण :- निंबळक ता . फलटण येथील बेवारस मयत मुलीच्या खुनाचा उलगडा ग्रामीण पोलीसांनी केला असून मयत मुलीच्या दाजीला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार , दि १ जुलै २०२० रोजी मौजे निंबळक ता . फलटण गावचे हददीत बनकर वस्तीकडे जाणारे रोडचे कडेला असणारे दतात्रय ढमाळ यांचे विहीरीत एका २० ते २५ वर्षे वयाच्या मुलीचा मृतदेह आढळून आला होता या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. पोलीस कर्मचारी यांनी सीटीझन पोर्टल अँपद्वारे व सी.सी.टी.एन.एस. प्रणाली व्दारे सातारा जिल्हा , सांगली जिल्हा , सोलापुर जिल्हा , पुणे ग्रामीण व शहर या जिल्हयात दाखल असणारे मिसींग मुलीचा शोध घेत असताना कडेगांव पोलीस ठाण्यात मिसींग रजि नं . १४/२०२० मधील मिसींग मुलगी वय १९ वर्षे रा . खेराडी ता . कडेगांव जि . सांगली हीचे वर्णनाची मिळता जुळता येत असल्याने पोलीसांनी मिसींग मुलीचे नातेवाईक वडील व आई दोन्ही रा . खेराडी ता . कडेगांव जि . सांगली यांना बोलावुन त्यांना बेवारस मयताचे अंगावरील कपडे व तीचे वापरती अंगठी , फोटो दाखवले त्यावरुन त्यांनी सदर फोटो , कपडे , अंगठी ओळखुन त्यांची मुलगी ही असल्याचे सांगीतले त्यानंतर केलेल्या तपासात गिरवी ता . फलटण गावी त्यांचा जावई हा राहण्यास असतो असे मयत मुलीच्या नातेवाईक यांनी सांगीतले असता पोलीसांनी गिरवी येथे जावुन संशयीत यास विश्वासात घेवुन गुन्हयाचे अनुशंगाने तपास केला . परंतु त्यांनी सुरुवातीस काही एक माहीती दिली नाही त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेतले असता त्यांने सांगितले की, मयत ही नात्याने मेव्हणी असुन आमचेत प्रेमसबंध होते त्यामुळे ती मला सतत लग्न कर असा तगादा लावत होती, परंतु मला तीचेबरोबर लग्न करायचे नव्हते. दि २९ जून २०२० रोजी ती माझेकडे गिरवी ता फलटण येथे भेटणेस आलेवर सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास मी तीला माझे मोटर सायकलवर बसवुन तीला गिरवी , दुधेबावी , वडले मार्गे निंबळक ता फलटण गावचे हददीत बनकर वस्ती येथी उसाचे शेतात आणुन तेथे तीचा गळा व तोंड दाबुन खुन केला व तीचेकडे असणारे पिशवीतील ब्लॅन्केट मध्ये तीला गुंडाळुन उसाचे शेतात रात्री ८ वाजण्याच्या सुमारास टाकुन दिले. त्यानंतर दुस – या दिवशी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास रस्त्याने कोणीही येत नाही याचा फायदा घेवुन मयत मेव्हणी हीचे प्रेत उसाचे शेतातुन आणुन रस्त्याचे कडेला असणारे विहीरीचे शेजारी पाण्यात टाकुन दिले अशी कबुली दिली.
सदरचा खून हा त्यांच्या जावाई यांनी केल्याचे निष्पण झाल्याने त्यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आलेली असून गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण तानाजी बरडे साहेब , फलटण ग्रामीण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे मार्गदर्शनाखाली सहा . पोलीस निरीक्षक एस.एस.बोंबले हे करीत आहेत.