फलटण :- चायनीज मांज्यामुळे एक जणांच्या गळ्याला मांज्या कापून जखमी झाल्याची घटना फलटण येथे घडली असून चायनीज मांज्या शहरात खुल्लम खुल्या पद्धतीने विक्री होत असल्याने पोलीस जाणीवपूर्वक चायनीज मांज्या विक्रीकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून फलटण शहरासह तालुक्यात अत्यंत धोकादायक असा चायनीज मांजा खुल्लमखुल्ला विक्री होत असल्याने या विक्री विरोधात पोलीसांनी कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत होती परंतु याबाबत पोलीसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे शहरात सर्वच ठिकाणी चायनीज मांज्याची सहजपणे विक्री केला जात होती. माणसांसाठी तसेच पक्षांसाठी अत्यंत धोकादायक असलेला या चायनीज माझ्यामुळे यापूर्वी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
आज फलटण येथे दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास सुरेश काकडे हे जिंती नाक्याकडुन मलटणकडे कामानिमित्त दुचाकीवरुन जात असताना अचानक रस्त्यावर लोंबत असलेला चायनीज मांज्या त्यांच्या गळ्याला कापला. यावेळी त्यांनी लगेच दुचाकीचा ब्रेक लावला व थांबले. चायनीज मांज्यामुळे सुरेश काकडे यांच्या गळ्याला गंभीर जखम झाली व रक्त येण्यास सुरुवात झाली यावेळी पाठीमागील बाजूकडून डॉक्टर गुंगा हे त्यांच्या गाडीतून येत होते त्यांनी ही घटना बघताच गाडी थांबवून सुरेश काकडे यांना लगेचच गाडीतून लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन आले. त्यानंतर त्यांच्यावर येथे लगेचच उपचार करून गळ्यावर टाके टाकण्यात आले या घटनेत सुरेश काकडे हे थोडक्यात बचावले असून गाडीचा वेग जास्त असतात अथवा माझ्याकडे दुर्लक्ष झाले असते तर गळ्याला गंभीर इजा होऊन जीव धोक्यात गेला असता.तसेच अचानक गाडीचा ब्रेक दाबल्यामळे पाठीमागून येणाऱ्या गाडीमुळे दुर्घटना झाली असती.
पोलीस यंत्रणा चायनीज मांज्या विक्रेत्याकडे कोणत्या कारणांमुळे दुर्लक्ष करत आहे हा प्रश्न नागरिक उपस्थित करत असून शहरात सर्रास रस्त्यावर चायनीज मांजा दिसून येत असून येणाऱ्या काळात या चायनीज माझ्यामुळे एखाद्याचा जीव धोक्यात आल्यास कोणावर कारवाई करावी ? कोणाला जबाबदार धरावे पोलीसाना की चायनीज मांज्या विक्री करणाऱ्या विक्रेते यांना ? हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत