फलटण :- झिरपवाडी येथील धरणाचे बाजूला विषारी औषध पिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अंतर्गत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय चंद्रकांत चव्हाण वय ४५ राहणार जिंती ता. फलटण सध्या राहणार झिरपवाडी ता. फलटण मुळ गांव कापुरव्हळ ता. भोर यांनी दिनांक 23 रोजी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास झिरपवाडी येथील धरणाचे बाजूला विषारी औषध पिले यानंतर त्यास उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे दाखल केले असता डॉक्टरांनी दत्तात्रय चव्हाण हे मयत झाले असल्याबाबत सांगितले फिर्यादी सीताबाई बाळू जाधव वय 55 राहणार झिरपवाडी ता. फलटण यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मयत रजिस्टर दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपास पोलीस नाईक लावंड हे करीत आहेत.