फलटण – आपले कर्तव्य बजावत असताना एका डॉक्टरला कोरोनाची बाधा झालेल्या घटनेला चोवीस तास पूर्ण होत नाहीत तोच आज पुन्हा दुसऱ्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाली असून सायंकाळी २ व रात्री उशिरा ११ असे एकूण १३ जणांना कोरोना बाधा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आज फलटण तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या २०० च्या पुढे गेली असून कोरोनाचा कहर असाच सुरू राहिला तर काय करायचे असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.
कर्तव्य बजावताना डॉक्टरला झाली कोरोनाची बाधा
बुधवार दि.२२ जुलै रोजी मौजे कोळकी येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ३ व १० वर्षांची मुले, ३३ व ६० वर्षांच्या महिला व ४० वर्षीय पुरुष अशी एकूण ५ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
दरम्यान गोळीबार मैदान, फलटण येथील यापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील २४ , २९ व ३३ वर्षीय पुरुष अशा एकूण ३ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच रविवार पेठ, फलटण मधील ५३ वर्षीय महिला व ५८ वर्षीय पुरुष यांची तसेच जिंती नाका, फलटण येथील ३६ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. असे दि २१ रोजी २८ अहवाल प्राप्त झाले असून यात एकूण १३ पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली आहे. वरील रुग्णांच्या निकट संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. दि २२ रोजी २७ जणांचे स्वॅप घेतले असून ५४ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.दि २२अखेर १८१७ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत ज्यांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. DCHC येथे २८ जण कन्फर्म वार्ड येथे ५२ वसस्पेक्ट वार्ड येथे ९७ जण दाखल आहेत.