फलटण : सध्या संपूर्ण जगामध्ये करोना या आजाराने थैमान घातलेले असताना फलटण तालुक्यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या काही काळामध्ये जास्त प्रमाणात दिसून आला नाही. अगदी तुरळक प्रमाणात रुग्ण फलटण तालुक्यामध्ये आढळून आले. सुरुवातीचे काही महिन्यांमध्ये फलटण शहरामध्ये तर एकही रुग्ण आढळून आला नाही. पण आता फलटण तालुक्यामध्ये करोनाने आपले हातपाय पसरले असून वाढती कोरोना रुग्णांची संख्या पहाता बआता नागरिकांनी स्वतःची स्वतः काळजी घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे. करोनाच्या बाबतीत आपण स्वतः आत्मनिर्भर होणे एवढेच आपल्या हातात असून आगामी काळामध्ये शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे एवढेच आता फलटणकर नागरिकांच्या हातात आहे. सध्या फलटण तालुक्यामधील करोनाची वाटचाल हि व्दिशतकापार गेलेली आहे. एकंदरीतच पहाता करोना हा आजार फलटणकर नागरिकांच्या घरातपर्यंत पोहचला आहे .
यातच फलटणमधील सत्यजित घोरपडे यांनी त्यांच्या सिद्धांत घोरपडे फाउंडेशनच्या वतीने कोरोना संकटाच्या काळात पहिल्यापासूनच सामाजिक कार्यात आघाडी घेतली होती त्यामध्ये त्यांनी अनेक गरजू लोकांना सिद्धांत घोरपडे फाउंडेशनच्या माध्यमातून सत्यजित घोरपडे यांनी पुढाकार घेऊन गरजूंना अन्नदान वाटप व किराणा मालासह धान्य वाटप घरपोच केले होते . तसेच नुकताच कंटेनमेंट झोन असलेल्या ब्राह्मण गल्ली येथे त्यांनी सिद्धांत घोरपडे फाउंडेशन तर्फे सॅनेटाइझेशन केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोख्ण्यासाठी फलटण मध्ये प्रथमच ‘सेनिटायजर होम’ ब्राम्हण गल्ली येथे करण्यात आले आहे की जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्ती वाहने यामधून सेनिटायज होऊन पुढे जातील व त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल . यासाठी ही सेवा त्यानी या फाऊंडेशनच्या माध्यमातून दिली आहे .त्यामुळे येथील सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व त्यांच्या या कार्याचे कौतुक करून आभार व्यक्त केले आहेत.