फलटण : आदर्श व उपक्रमशील शिक्षक श्री.रविंद्र लटिंगे सर हे ता.वाई या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सरांनी आपल्या भटकंती प्रवासाचा आठवणीतल्या साठवणी याचा १००वा भाग पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे प्रथमतः अभिनंदन!!!
एप्रिल महिन्यात सुरू झालेली भटकंतीचा प्रवास, साठवणीतील आठवणी लेखनाचा आज श्रावण महिन्यात १०० भाग पूर्ण होत असताना
यावेळेस मला बालकवींच्या कवितांच्या काही ओळी आठवतात,
श्रावण मासी हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवे,
क्षणात फिरुनी उन पडे.
या काव्य पंक्तीप्रमाणे त्यांचे लिखाण मनामध्ये हर्ष ,उल्हास, नवचेतना, निसर्ग अनुभव, याची प्रचिती देऊन जात आहेत. सध्याच्या लॉकडाउनच्या काळामध्ये
घर बसल्या कडक उन्हाळ्यातही आदरणीय सरांचे लिखान मनाला आणि चित्ताला गारवा देऊन जात होते. त्यांच्या लेखणीत खूप मोठी ताकत आहे त्यांनी असेच पुढे लिहीत राहावे हे मनापासून मनापर्यंत आलेली इच्छा!
खरतरं उपक्रमशील शिक्षक समूहातील सर एक सदस्य आणि या उपक्रमशील शिक्षक समूहाचे कुटुंब प्रमुख आदरणीय सुनील शेडगे सर यांच्या लिखाणामुळे अनेकांना लिखाणाची प्रेरणा मिळाली आणि त्याची प्रचिती आज आपणास दिसून येत आहे.नुकतेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय श्री.भागवत साहेब ,शिक्षणाधिकारी कोळेकर मॅडम, माध्यमिक शिक्षणाधिकारी क्षीरसागर साहेब व सकाळ वृत्तपत्राचे संपादक यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झूम मीटिंग द्वारे उपक्रमशील शिक्षक हे अतिशय प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन झाले, या पुस्तकातही लटिंगे सर यांच्या कार्याचा लेख मनाला प्रेरणा देतो.
खरंतर आदरणीय रवींद्र लटिंगे सर यांना आपल्या आई प्रतिष्ठान
वाठार निंबाळकर चा पुरस्कार त्यांचा कोणताही प्रस्ताव न येता केवळ त्यांच्या कार्याचा सुगंध दरवळत आपल्यापर्यंत पोहचला यांनी त्यांना तो दिला गेला, आणि त्यांची प्रथम भेट 28 नोव्हें, 2018 रोजी वाठार निंबाळकर या ठिकाणी झाली.सर्वात अगोदर कार्यक्रमाला पोहचलेले आणि कार्यक्रमासाठी ,नियोजनासाठी तयारीला काही मदत लागली तर आवर्जून सांगा म्हणणारे त्यांचे सर्व मित्र परिवार,असा सरांच्या स्वभावातील मुख्य सहकार्य गुण त्या ठिकाणी दिसून आला.त्यावेळी त्यांना श्रीमंत संजीवराजे ना.निंबाळकर (मा.अद्यक्ष जि.प.सातारा ) यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.मला मनापासून खूप आनंद होतोय की ते आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर चे एक सदस्य झाले आहेत.
आदरणीय रवींद्र सरांनी भटकंतीचा प्रवास जो लिहिलेला आहे तो खरोखरच सर्वांना प्रेरणादायी तर आहेच परंतु इतरही निसर्गप्रेमींना फिरताना त्या लेखाचा ,लिखाणाचा खूप मोठा फायदा होणार आहे.
सरांनी या लेखनाचे एक सुंदर असं पुस्तक तयार करावे, असं मनापासून वाटतं त्या पुस्तकासाठी आई प्रकाशन वाठार निंबाळकर हे त्यांना प्रकाशन म्हणून सहकार्य करील.
आज १०० व्या भागा निमित्त आदरणीय सरांना त्यांच्या घरी जाऊनच शुभेच्छा देण्याचा मानस होता.परंतु सध्याची कोरोणा सदृश्य परिस्थिती पाहता सरांना फोनवर आणि या लेखाद्वारे खूप साऱ्या शुभेच्छा! आपण सर असेच लिहीत राहावे आणि आम्हा वाचकांना तुमचे लिखाण वाचण्यासाठी मिळत राहो.
ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट पाहतो आणि पडणारे पावसाचे पाणी अलगद धरतो ,त्याच प्रमाणे आपल्या लिखाणाची वाट चातक पक्षाप्रमाणे आम्ही सर्वजण पाहत असतो,आणि ते लिखाण मनाच्या हृदयाच्या कप्प्यांमध्ये या आठवणीतील साठवणी साठवून ठेवत असतो. या लेखनाच्या १०० व्या भागाप्रमाणे आपले आयुष्यही शतायुषी व्हावे ही सदिच्छा!
तुम्हाला पुन्हा एकदा समस्त शिक्षक परिवार आणि आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर कडून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
This comment has been removed by the author.
धन्यवाद फलटण टुडे आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻🌹
आई प्रतिष्ठान वाठार फलटणचे अध्यक्ष श्री गणेशजी तांबे सर आपण माझी भटकंती या लेख मालिकेचे कौतुक करुन मिडियाला अभिप्राय दिलात.त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻
कौतुक दोन्ही कर्तुत्ववान आणि उपक्रमशील व्यक्तिमत्त्वांचे
लटिंगेसर, आपण माझी भटकंती या लेख मालिकेचे लिखाण अभ्यास पुर्वक केलेले असुन आपल्या शिक्षकबांधवांना त्याचा चांगला उपयोग होईल असे मला वाटते.