गोखळी वार्ताहर : फलटण तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत गोखळी उपसरपंचपदी राजे गटाच्या तंटामुक्ती अध्यक्ष मनोज तात्या गावडे यांच्या नेतृत्वात कर्नाटक केसरी कै पै. आनंदराव जाधव यांच्या नातसून सौ रंजना राधेशाम जाधव यांची बिनविरोध निवड झाली.*
*यावेळी सरपंच सौ सुमनताई हरिभाऊ गावडे( सवई) यांच्या अध्यक्ष खाली झालेल्या विशेष सभेमध्ये सौ रंजना राधेशाम जाधव यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब आटोळे. डॉ गणेश गावडे. सागर गावडे (पाटील). अभिजित जगताप. सौ स्वप्ना गावडे. सौ सुनीता गावडे. ग्राम विस्तार अधिकारी श्री गणेश दडस उपस्थित होते. यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून बांधकाम विभागाचे श्री गरुड साहेब यांनी काम पाहिले.*
*यानंतर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर.फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आमदार दीपक चव्हाण. फलटण पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरूप राजे निंबाळकर (खर्डेकर) यांनी शुभेच्छा दिल्या*
*तसेच उपसरपंच सौ रंजना राधेशाम जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्ञानदेव बापू गावडे. तंटामुक्ती अध्यक्ष मनोज तात्या गावडे. खटकेवस्ती सरपंच बापुराव गावडे. उपसरपंच नवनाथ गावडे (पाटील). गोखळी गावचे माजी सरपंच नंदकुमार (मामा) गावडे. रमेश दादा गावडे. अमित भैया गावडे. व योगेश गावडे (पाटील ). बाळासाहेब (भाऊ) गावडे. पत्रकार राजेंद्र भागवत. सुनील धुमाळ. शांताराम गावडे. राधेश्याम जाधव . योगेश गावडे (सवई).शैलेश जगताप. दीपक चव्हाण. पिंटू जगताप. दिलीप गावडे. अमित जगताप अमोल हरियर. ज्ञानेश्वर घाडगे मुन्ना शेख उपस्थित होते,*