फलटण — *महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या दलित , ओबीसी , मागासवर्गीय, भटक्या विमुक्त , अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ , महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ , वसंतराव नाईक विमुक्त जाती व जमाती विकास महामंडळ अल्पसंख्यांक विकास महामंडळ ,अपंग विकास महांडळ, आण्णासाहेब पाटील विकास महामंडळ या महामंडळांचे कामकाज गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक निधीअभावी पूर्णतः ठप्प झाले असून या महामंडळाना केद्र तसेच राज्य शासनाने त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त दशरथ फुले यांनी केली आहे*
देशभर करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे शासनाला लॉकडाउन करावे लागले याचा परिणाम सर्वच क्षेत्रातील व्यवहारावर झाला असून अनेकांना आपल्या नोकऱ्यावर पाणी सोडवे लागले आहे त्या मुळे अनेकांनवर उपासमाची वेळ आली आहे
या करोनाच्या काळात ज्यांच्या नोकऱ्या गेल्या लॉकडाउन मुळे छोटे मोठे उद्योग व्यावसाय अडचणीत आले आहेत अशांना भांडवलाची मोठ्या प्रमाणात गरज आहे त्या साठी शासनाने या महामंडळा मार्फत मागासवर्गी घटकातीत विविध जाती जमातीतील बेरोगाना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी दशरथ फुले यांनी केली आहे
या पूर्वी महामंडळांची कर्ज माफी झाली होती त्या वेळ पासून पाहिजे त्या प्रमाणात शासनाने या महामंडळांना निधी उपलब्ध करून दिला नाही त्या मुळे ही महामडळे अडचणीत आली आहेत
केंद्र तसेच राज्य शासन या मागासवर्गीय समाजाच्या सार्वजनिक कल्याणासाठी मोठ्या प्रमाणात दरवर्षी आर्थिक निधी उपलब्ध करून देते गेल्या अनेक वर्षापासून महामंडळांकडून पाहिजे त्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला जात नसेल तर मागासवर्गी समाजासाठी तरतुद केलेला निधी कोठे जातो असा सवालही दशरथ फुले यांनी केला आहे
राज्यभरात दलीत, ओबीसी , मागासवर्गीय ,भटक्या विमुक्तांची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात आहे हा समाज आर्थिक व सामाजिक दुष्ट्या अत्यंत मागे असून या समाजाला या मामडळांच्या माध्यमातून आर्थिक चालना देण्याची गरज आहे तसेच या महामंडळावर गेल्या अनेक वर्षापासून अध्यक्ष तसेच संचालक मंडळ नेमणूक केलेले नाही त्या मुळे या महामंडळावर कोणाचेही नियंत्रण राहीलेले नाही तरी अध्यक्ष सह संचालकाची नेमणूक करावी व महामंडच्या विकास चालना द्यावी अशी मागणी दशरथ फुले यांनी केली आहे