फलटण : गेली अनेक वर्ष रखडलेले रस्त्याचे काम चालु झाले.घाडगेमळा ते सासवड ग्रामीण मार्ग पूर्णपणे उध्वस्त झालेला होता .सदर रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा असलेने एकदम संपूर्ण काम करणे शक्य नव्हते.जि.प.मध्ये ठराव करुन हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करणेसाठी सातत्याने पाठपुरावा केला .रस्ता हस्तांतरण करणे खुप कीचकट काम होते परंतु सातत्याने पाठपुरावा व मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभापती ,विधानपरिषद महाराष्ट्र राज्य मा.आ.दिपकराव चव्हाण ,मा.श्रीमंत .रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे माध्यमातून रस्ता हस्तांतरण झाला व राज्य बजेट मधुन निधी मिळाला .जवळपास २कोटी ५०लक्षरुपये मंजूर होऊन आज प्रत्यक्ष काम चालु झाले .बरीच वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला .तसेच हिंगणगाव ,सासवड मुळीकवाडी नांदल चे नागरिकांसाठी सासवड -मुळीकवाडी-नांदल ते फलटण रस्त्यासाठी जि.प.(जिल्हा नियोजन मधुन )१कोटी निधी मंजुर आहे .येत्या काही दिवसामध्ये नांदलमार्गे ढवळेवाडी काशिदवाडी फरांदवाडी फलटण रस्ता मार्गी लागणार आहे त्यामुळे बरेच अंतर वाचणार आहे .याकामी मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे मोठे सहकार्य लाभले.