फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणेच्या माध्यमातून मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) परीक्षेस फलटण शहर व तालुक्यातील 28 माध्यमिक विद्यालयातून 3596 विद्यार्थी/विद्यार्थिनी या परीक्षेस बसले त्यापैकी 3329 उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकत्रित निकाल 92.57% लागला आहे. त्यापैकी 245 विद्यार्थी/विद्यार्थिनी विशेष प्राविण्यात, 1148 प्रथम श्रेणीत, 1776 द्वितीय श्रेणीत, 160 उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत. या सर्व विद्यार्थी/विद्यार्थिनींचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
जयभवानी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तिरकवाडी, उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विडणी आणि अंबिशन इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, आदर्की या 3 विद्यालयांचे निकाल 100 % लागले आहेत.
मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, फलटणचा निकाल 99.72% लागला असून तेथून परीक्षेस बसलेल्या 733 पैकी 731 विद्यार्थी/विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुधोजी हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय फलटणचा निकाल 98.38 % लागला असून तेथून परीक्षेस बसलेल्या 679 पैकी 668 विद्यार्थी/विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.
फलटण शहर व तालुक्यातील अन्य विद्यालयांचा इयत्ता 12 वी निकाल खालीलप्रमाणे – मुधोजी महाविद्यालय, फलटण 87.56 %, सरदार वल्लभभाई ज्युनिअर कॉलेज, साखरवाडी 87.20 %, यशवंतराव चव्हाण ज्युनिअर कॉलेज, फलटण 87.82 %, मुधोजी हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, फलटण 98.38 %, मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, फलटण 99.72 %, छ. शिवाजी ज्युनिअर कॉलेज, गिरवी 86.11 %, सौ. वेणूताई चव्हाण कन्या हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण 91.66 %, ज्योतिर्लिंग हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, पवारवाडी (आसू) 86.76 %, फलटण हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, फलटण 72 %, सरस्वती माध्यमिक विद्यालय ज्युनिअर कॉलेज, बिबी 80.76 %, हनुमान माध्यमिक विद्यालय ज्युनिअर कॉलेज, गोखळी 53.84 %, श्रीमती प्रेमलाताई चव्हाण ज्युनिअर कॉलेज, फलटण 96.29 %, महात्मा फुले हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, सासवड 85.71 %, सरलष्कर श्रीमंत बाबाराजे खर्डेकर ज्युनिअर कॉलेज, हणमंतवाडी 71.42 %, हणमंतराव पवार हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, फलटण 68.75 %, मॉडर्न हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, बरड 90.32 %, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल ज्युनिअर कॉलेज, जाधववाडी (फलटण) 97.67 %, आंदरुड माध्यमिक विद्यालय आंदरुड 78.57 %, सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, तरडगाव 81.25 %.
श्री जानाई हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, राजाळे 87.50 %, सरदार वल्लभभाई ज्युनिअर कॉलेज, साखरवाडी 87.50 %, यशवंतराव चव्हाण कॉलेज, फलटण 95.08 %, मुधोजी हायस्कूल, फलटण 95.38 %, मालोजीराजे शेती ज्युनिअर कॉलेज, फलटण 96.77 %, वेणूताई चव्हाण गर्ल्स ज्युनिअर कॉलेज, फलटण 96.22 %.