फलटण :- किरकोळ कारणावरून व चारित्र्याचा संशय घेऊन महिलेस शारीरिक मानसिक छळ करून शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी पतीसह चार जणांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अस्मिता महेश देशमुख रा.वनदेवशेरी कोळकी ता फलटण यांचा एप्रिल 2009 पासून आजपर्यंत कोळकी व आरे तर्फ परळी येथे घरातील किरकोळ कारणावरून व चारित्र्याचा संशय घेऊन पती व इतर चारजण यांनी फिर्यादी महिलेचा शारीरिक मानसिक छळ करून शिवीगाळ दमदाटी केली. नवरा महेश देशमुख यांनी दारू पिऊन येऊन वारंवार मारहाण केली. नवरा हा दारू पिऊन येऊन रात्री-अपरात्री शेजार्यांना शिवीगाळ केली त्याचा त्रास फिर्यादी यांना झाल्याने तसेच फिर्यादी यांना त्रास देण्याचे सतत चालूच ठेवले अशा प्रकारे महिलेचा शारीरीक व मानसिक छळ केल्याने महेश व्यंकट देशमुख (पती), व्यंकट श्रीपती देशमुख (सासरे), कुसुम व्यंकट देशमुख (सासु) सर्व राहणार वनदेवशेरी ता फलटण, भरत व्यंकट देशमुख (दीर) अरे तर्फे परळी, राणी राजेंद्र यादव राहणार कोळकी ता. फलटण यांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल भोईर हे करीत आहे.