फलटण : १५ जुलै २०२० च्या जीआर नुसार २७/२/२०१७ च्या शासन निर्णयानुसार बदल्या करण्यास सांगितलेले आहे. पण प्रत्यक्षात या जीआर मध्ये काही बदल करणे आवश्यक होते त्यादृष्टीने पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्यातील विविध संघटना प्रतिनिधींची मिटींग होऊन यामध्ये काही योग्य बदल करण्याविषयी सकारात्मक चर्चा होऊन सर्वांनी स्क्रीनवर बदल्या करण्यास सहमती दाखवली होती परंतु प्रत्यक्षात तसे काही होताना दिसत नाही.
त्याचप्रमाणे २७/२/२०१७ च्या शासन निर्णयानुसार संवर्गानुसार बदल्या न झाल्याने अनेक शिक्षकांची गैरसोय झालेली होती.
तरी या संदर्भात येत्या काही दिवसात योग्य ते बदल करण्यासाठी काही शुध्दीपत्रके काढणे गरजेचे आहे तरी या संदर्भात योग्य ती कार्यवाही करणेसाठी ग्रामविकासमंत्री महोदयांबरोबर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य आयडियल बहुजन टिचर्स असोसिएशन (इब्टा) पाठपुरावा करेल.