गोखळी (प्रतिनिधी ) फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण संकलित श्री.जानाई हायस्कूल व ज्युनियर काॅलेज राजाळे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे फलटण – कोरेगांव विधानसभा मतदार संघ संपर्क प्रमुख मा. पै बजरंग गावडे यांची कन्या कुमारी धनश्री बजरंग गावडे हिने एच.एस.सी. ( 12 वी) वाणिज्य परिक्षेत 72 % टक्के मार्क मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. विद्यालयाच्या कला शाखा= 77.77% तर वाणिज्य शाखा =91.30% वार्षिक निकाल लागला. या यशाबद्दल कु.धनश्री गावडे हि चे मा. सुभाषकाका सुर्यवंशी-बेडके संचलित श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण चे अध्यक्ष सचिन भैय्या सुर्यवंशी- बेडके काॅलेज प्राचार्य बेंद्रे सर ,निळकंठ निंबाळकर सर खुंरूगे सर धुमाळ मॅडम निंबाळकर मॅडम सोनवलकर सर खरात मॅडम यांनी अभिनंदन केले.