फेरेरो इंडिया च्या वतीने वृषारोपन संपन्न

बारामती:  बारामती एमआयडीसी परिसरातील फेरेरो इंडिया च्या वतीने वन महोत्सवा निमित्त कटफळ ग्रामपच्यात हद्दी मध्ये   वृषारोपन केले या वेळी कटफळ ग्रामपच्यात च्या सरपंच सारिका भारत मोकाशी,फेरेरो चे प्रादेशिक प्रकल्प व्यवस्थापक डॅनियल पेरोटटीनो,एच आर मॅनेजर उमेश दुगानी आदी मान्यवर उपस्तीत होते. आंबा, पिंपळ,कडू लिंब,चिंच,पिंपळ आदी विविध प्रकारचे 100 रोपांचे वृषारोपन करण्यात आले.औषधें, आहार साठी उपयोगी व कार्बन उतसर्जन कमी करण्यास सदर वृषारोपन कामी पडणार आहे.जगातील कार्बन चे प्रमाण कमी व्हावे  व ऑक्सिजन चे प्रमाण वाढावे व पर्यावरण संतुलन राहावे या साठी फेरेरो उद्योग समूह कार्य करत असते शाशवत पर्यावरणाचा अवलंब करत,शासनाच्या व सामाजिक पर्यावरण च्या विविध उपक्रमास नेहमीच फेरेरो सहकार्य करत असते,या वृषारोपन च्या माध्यमातून एमआयडीसी परिसरात 1.2 कार्बन उतर्सजन साठी आळा बसणार आहे व लवकरच 10 कोटी गुंतवणूक करून कंपनीच्या छतावर सोलर प्रोजेकट  बसवून सोलर निर्मिती जेली जाणार आहे ,मानवाच्या उत्कृष्ट जीवनासाठी पर्यावरण महत्वाचे आहे व पर्यावरण टिकवण्यासाठी व वाढण्यासाठी फेरेरो इंडिया कटिबद्ध असल्याचे प्रादेशिक प्रकल्प व्यवस्थापक डॅनियल पेरोटटीनो यांनी सांगितले. कटफळ व परिसरात फेरेरो इंडिया नेहमीच सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यात अग्रेसर असते महिलांना  रोजगार ,बालकांना शिक्षण ,पर्यावरण ,दुष्काळ च्या वेळी विविध मदत च्या माध्यमातून सामाजिक भान व जाण जपली असल्याचे सरपंच सारिका मोकाशी यांनी सांगितले.

PHALTAN TODAY

बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-

प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015

आपल्या जिल्ह्यातील  बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!