बारामती वृत्तसेवा : रुई येथील शुभांगी चौधर यांची वंजारी सेवा संघ महिला आघाडी च्या पश्विम महाराष्ट्र महिला अध्यपदी निवड करण्यात आली आहे. शुभांगी चौधर या त्रिवेणी ऑइल मिल व फूड्स च्या संचालिका,पोलीस मित्र संघटना व विविध सामाजिक संघटना वर कार्य करत आहेत. राज्य व केंद्र शासनाचे आणि विविध संस्थांचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.समाज्यातील उपेक्षित, वंचित,शेतमजूर,घरकामगार,ऊसतोड कामगार,शासकीय,निमशासकीय,
खाजगी आदी क्षेत्रातील महिलांच्या न्याय व हक्क साठी संघटन करणार असून समाजकारण व राजकारणात महिलांचा सहभाग व सक्रियता वाढवण्यासाठी कार्य करणार आहे शासनाच्या व विविध बँकेच्या विविध योजने च्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रत्यन करणार असल्याचे निवडीनंतर शुभांगी चौधर यांनी सांगितले.