अरे संसार, संसार
अरे संसार, संसार
जसा मायक्रोवेव्ह घरात
न लागता हातास चटके
करू हवी ती डिश तयार । १ ।
अरे संसार, संसार
न लागे धुण्यासही वेळ
मॉडर्न दिवस हे
वॉशिंग मशीन चा ग काळ । २।
अरे संसार, संसार
नाही दळणं-कांडणं
मिक्सरच्या उपयोगाने
झाले सोपे वाटणं-घोटणं । ३।
अरे संसार, संसार
नाही एकत्र कुटुंबाचा विचार
मी जाते ऑफिसला
म्हणून बाळाला ग पाळणा घर ४
अरे संसार, संसार
मनुजा रे चंद्रावर
वृध्द जन्म-दात्यांना
बंद रे घरचे द्वार । ५ ।
अरे संसार, संसार
सर्वच प्रगती पथावर
शाळा पडल्या ओस
गुरू-शिष्य मोबाईलवर। ६।
अरे संसार, संसार
संपुष्टात पत्रव्यवहार
वगळता पंंगती,
मुंजी, लग्ने ऑनलाईन वर। ७।
– सौ ममता उदयकुमार शहा
“श्रमसाफल्य’ बारस्कर गल्ली,फलटण