फलटण : फलटण तालुक्यामध्ये कोरोना ह्या महाभयंकर आजाराचे एकूण रुग्ण १२६ असून आज अखेर ६५ रुग्ण कोरोना मुक्त झालेले आहेत. तर ८ जणांचा कोरोना या आजराने मृत्यू झालेला आहे. तर ५३ कोरोना बाधित रुग्ण सद्य स्थितीत उपचार घेत आहेत. सदरची आकडेवारी हि दिनांक १४ जुलै २०२० रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत असल्याची माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.
फलटण तालुक्यामध्ये कोरोना रुग्ण संख्या १२५ पार
फलटण तालुक्यामध्ये काल (दिनांक १४ जुलै) रोजी २०१० व्यक्ती होम क्वारंटाईन असून त्यांचा १४ दिवसांचा गृह विलीगीकरणाचा कालावधी पूर्ण झालेला नाही. फलटण येथील कोरोना केअर सेंटरच्या कन्फर्म वार्ड मध्ये १३ रुग्ण असून सस्पेक्ट वार्ड 87 जण आहेत. व संस्थामक विलीगीकरण कक्षात कोणीही नाही. तर सुमारे ६१ जणांचे कोरोना बाबतचे अहवाल प्रलंबित असल्याचेही शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.