फलटणमध्ये लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन :उपविभागीय अधिकारी डॉ . शिवाजीराव जगताप व पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी केले आहे

फलटण : सातारा जिल्ह्यातील कोरोना कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यात 17 जुलै पासून 26 जुलै पर्यंत क्रिमीनल प्रोसिजर कोडचे कलम 144 नुसार मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशास फलटण तालुक्यातील जनतेने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप व पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी केलेले आहे. या आदेशास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांच्या विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860 ) कलम 188 नुसार दंडनीय व कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात येईल असे फलटण पोलीस उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांनी स्पष्ट केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!