बारामती: बारामती एमआयडीसी येथील पायोनियर इंजिनियर्स च्या लहू उद्योगास इजिप्त देशातून मानवी शरीरात वापरण्यात येणारे कृत्रिम सांधे इम्प्लांट पुरवण्याची मागणी आली असून त्याच्या पहिल्या एक्सपोर्ट कंसाइनमेंटची रवानगी करण्यात आली . पायोनियर इंजिनियर्स चे पिता-पुत्र राधेश्याम सोनार व शार्दुल सोनार, बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे
अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, सदस्य मनोहर गावडे, महादेव गायकवाड, मनोज पोतेकर, हरीश कुंभरकर, शिवाजी निंबाळकर, ऍड शेख , भारत जाधव, कृष्णा ताटे, हेमंत हेंद्रे, सदाशिव थिटे, रावसाहेब पाटील, चंद्रकांत नलवडे, दत्तात्रय पानसरे, आर बी पाटील, सतिष किर्दक, अभिजीत शिंदे, शिवराज जामदार आदी उपस्थित होते.
जगभरात निर्यात करण्याची ग्रामीण भागातील लघु उद्योजकांमध्ये गुणवत्ता व क्षमता असल्याचे धनंजय जामदार यांनी सांगितले.
” पायोनियर इंजिनियर्स या लघु उद्योगा मध्ये मानवी शरीरात वापरण्यात येणारे कृत्रिम सांधे, रोबोट, विमान, बंदूक, व्हॉल्व्ह, ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्रांमध्ये लागणारे सुटे भाग उच्च तंत्रज्ञान व गुणवत्ता वापरून उत्पादन केले जाते. गुणवत्तेच्या अनेक चाचण्या यशस्वी केल्यानंतरच आम्हाला इजिप्त देशाने आमच्याकडून उत्पादने मागवली असून लवकरच अमेरिका व युरोप देशातही आमची उत्पादने वापरले जातील ” अशी माहिती संचालक राधेश्याम सोनार व शार्दुल सोनार यांनी यावेळी दिली.
या प्रसंगी उपसितांचे स्वागत व आभार प्रदर्शन शार्दूल सोनार यांनी केले.