फलटण टुडे: कोरोना प्रार्दुभावामुळे विज वितरण कंपनीने कोरोना कालावधीत विज देयके ३ महिन्याचे एकत्रीत पाठविले आहेत. वीज देयके सरासरी पेक्षा जास्त असलेने सर्व तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी पंचायत समिती सदस्यांना येत आहेत. तरी सदरची विज बिले दुरुस्त करून त्या वर योग्य तो कार्यवाही वीज वितरण कंपनीने करावी असा ठराव फलटण पंचायत समितीच्या मासिक सभेत पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांनी उपस्थित केल्यानंतर सर्वांनुमतें मंजूर करण्यात आला. त्या नंतर फलटण पंचायत समितीतर्फे त्या बाबत वीज वितरण कंपनीला सविस्तर निवेदन देण्यात आले.
या वेळी फलटण पंचायत समितीच्या उपसभापती सौ. रेखा खरात, माजी सभापती व सदस्या सौ. रेश्मा भोसले, सौ. प्रतिभा धुमाळ, सदस्य सचिन रणवरे, बाळासो ठोंबरे, संजय सोडमिसे, संजय कापसे यांची उपस्थिती होती.