29 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज;* *एका बाधिताचा मृत्यू 503 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

सातारा दि.13 (जिमाका) : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 29 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये *खटाव तालुक्यातील* कातरखटाव येथील 27 वर्षीय पुरुष, फडतरवाडी येथील 55 वर्षीय महिला
*कराड तालुक्यातील* कराड शहर – सोमवार पेठमधील 46 वर्षीय महिला, बनवडी येथील 48 वर्षीय पुरुष, तळबीड येथील 43 वर्षीय पुरुष, कृष्णा रुग्णालातील 26 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 50 वर्षीय पुरुष, हावलेवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, तारुख येतील 40 व 45 वर्षीय महिला, जखिणवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय महिला, लटकेवाडी येथील 19 वर्षीय पुरुष, चरेगाव येथील 55 वर्षीय महिला.
*पाटण तालुक्यातील* नवसारी येथील 15 व 17 वर्षीय तरुण, 36 वर्षीय महिला, सडादाढोली येथील 29 वर्षीय महिला, 11 व 4 वर्षीय बालिका, काजरवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, उरुळ येथील 60 वर्षीय पुरुष.
*सातारा तालुक्यातील* सातारा शहर – प्रतापगंज पेठ येथील 46 वर्षीय पुरुष, जिहे येथील 42, 20, 49, 36, 25 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला.
*एका बाधिताचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे पुनवडी ता. जावली येथील 67 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, या पुरुषाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
*503 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 27, कृष्णा हाॅस्पिटल कराड येथील 76, उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 60, कोरेगाव येथील 13, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 55, शिरवळ येथील 84, रायगाव येथील 29, पानमळेवाडी येथील 21, मायणी येथील 22, महाबळेश्वर येथील 6, पाटण येथील 38, खावली येथील 28, दहिवडी येथील 27, असे एकूण 503 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीकरीता एन.सी.सी.एस पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!