बारामती प्रतिनिधी :कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने वेळेत केला बदल बारामतीमध्ये आज दि.१२ रोजी तब्बल १८ रुग्णांची वाढ झाली असून एकूण रुग्ण संख्या ५८ झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने बारामतीकरांमध्ये चिंतेचे वातावरण असून खबरदारीचा उपाय म्हणून दि.१३ जुलै पासून वेळेमध्ये पुन्हा बदल करण्यात आला आहे,व्यापारी संघटना व स्थानिक अधिकारी यांच्या बैठकीत हा निर्णय झाला असून सर्व व्यवहार सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत चालू रहाणार असल्याचे अधिकारी व व्यापारी संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
अशी माहिती उपविभागीय अधिकारी, दादासाहेब कांबळे यांनी दिली व व्यापारी महासंघाचे संघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराती यांनी दिली