बारामती: कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणा मुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना, पूर्ण देशातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. अशावेळी या विषाणू पासून त्यांचे संरक्षण होणे हे ही गरजेचे आहे.त्यासाठीच जलनेती हा एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुढे येत आहे. बारामतीतील जीवनविद्या योग आयुर्वेद फौंडेशन व मेडिकोज गिल्ड यांनी डॉक्टरांसाठी जलनेती प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यावेळी बारामती शहरातील अनेक नामांकित डॉक्टरांनी उस्फुर्त पणे सहभाग घेऊन जलनेती केली. बारामतीतील योगाचार्य डॉ निलेश महाजन व डॉ भक्ती महाजन यांनी या डॉक्टरांना जलनेती चे शास्त्रीय प्रशिक्षण दिले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमाचे पालन करून हे प्रशिक्षण देण्यात आले.
जलनेती ही एक यौगिक शुद्धीक्रिया आहे, त्याद्वारे आपण आपल्या नाकाच्या आतील भागाची स्वछता करू शकतो, त्यामुळे अनेक आजारांसोबत विषाणू संक्रमण जन्य काळात आपण जलनेती चा अभ्यास केला तर आपण आजाराला प्रतिबंध करू शकतो किंवा त्याची तीव्रता कमी करू शकतो,गेले अनेक वर्षे आम्ही आमच्या रुग्णांना जलनेतीचे प्रशिक्षण देत आहोत त्याचा सकारात्मक परिमाण आम्हाला दिसून आले आहेत, यासाठी सर्वांनीच या काळामध्ये जलनेती करने आवश्यक आहे. गरज पडल्यास सर्व आरोग्य व पोलीस कर्मचाऱ्यांना जलनेतीचे प्रशिक्षण देण्याचा आमचा मानस आहे, असे मत योगाचार्य डॉ निलेश महाजन यांनी व्यक्त केले.
विषाणू संक्रमणाच्या काळामध्ये सर्वच शास्त्र पूर्ण ताकदीने लढत आहे,डॉक्टर व आरोग्य व्यवस्थेवर ताण आहे अशा वेळी प्रतीबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे त्यामुळे प्राचीन शास्त्राची मदत घेणे गरजेचे आहे ,त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रतिबंधात्मक म्हणून जलनेतीचा उपयोग होऊ शकतो यासाठी डॉक्टरना याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळावे या साठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, असे मेडिकोज गिल्ड चे अध्यक्ष डॉ संजय पुरंदरे यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेडिकोज गिल्ड चे अध्यक्ष डॉ संजय पुरंदरे, डॉ चंद्रकांत पिल्ले, डॉ अशोक तांबे , डॉ तुषार गदादे, डॉ राजेंद्र चोपडे यांनी मार्गदर्शन केले.
Doing very nice job. May Universe bless you with unlimited energy to help people to build immunity.
Doing healthy awairness