फलटण दि ११: फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण यांच्या वतीने, दिनांक 15 जुलै २०२० पासून “आर्यभट्टाचे गणित” या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय देशमुख यांनी दिली.
सदर व्याख्यानमाला ही ऑनलाईन पद्धतीने होणार असुन इंडियन अकॅडमी फॉर इंडस्ट्रियल अँड अप्लाईड मॅथेमॅटिक्स, भास्कराचार्य प्रतिष्ठान व मॅथेमॅटिक्स कन्सोर्शियम यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे लोकमान्य टिळक चेअर प्रोफेसर डॉ.एस. ए. कात्रे हे या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. व्याख्यानमालेतील पहिले व्याख्यान दिनांक 15 जुलै रोजी, दुसरे व्याख्यान दिनांक 23 जुलै रोजी, तिसरे व्याख्यान 29 जुलै रोजी तर चौथे व अंतिम व्याख्यान हे दिनांक 5 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी ४.०० ते ५.३० या वेळेत होणार आहेत. महाविद्यालयाच्या युट्युब चॅनेल त्या माध्यमातून याचा लाभ घेता येणार आहे.
सदरची व्याख्याने मराठी भाषेतून होणार असून सर्व सामान्य लोकांपासून ते गणितामध्ये संशोधन करणार्या संशोधकांपर्यंत सर्वच लोकांना समजेल व उपयोगात पडेल अशा पद्धतीची ही व्याख्यानमाला असणार आहे. विज्ञान व अभियांत्रिकी मध्ये गणिताचे असणारे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन अवघड व कंटाळवाणे वाटणारे गणित किती सोप्या पद्धतीने शिकता येते हे या व्याख्यानाच्या माध्यमातून सर्व लोकांना समजेल, व त्याच्या माध्यमातून गणित विषयाबाबत आवड निर्माण होईल या उद्देशाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.त्याच पद्धतीने थोर गणित तज्ञ आर्यभट्ट यांनी गणितामध्ये केलेले संशोधन सर्व विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक यांच्यापर्यंत पोचवणे हा हा उद्देश लक्षात घेऊन या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व लोकांनी या व्याख्यानमालेचा फायदा करून घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय देशमुख यांनी केले आहे.