फलटण : डॉ . बाबासाहेब आंबेडकरयांनी ज्या राजगृहात संविधान लिहिले त्या निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्यांवरक शासन करून त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी आर पी आयचे (A) (निकाळजे गट ) तालुका अध्यक्ष संजय गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे .
निवेदनामध्ये दादर मुंबई येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह हे निवासस्थान आहे. याठिकाणी अज्ञात आरोपींनी तोडफोड केली. वास्तविक राजगृह हे तमाम दलित बौद्ध व उपेक्षितांचे प्रेरणा ठिकाण आहे. हा हल्ला म्हणजे आंबेडकरी विचारांवर हल्ला आहे. सदर घटनेने संपूर्ण बौद्ध बांधव व दलित समाजात संतापाची लाट उसळली आहे. या आरोपीचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे .
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ . शिवाजीराव जगताप यांना निवेदन देताना आर पी आय (A) (निकाळजे गट ) तालुकाध्यक्ष संजय गायकवाड,अजित मोरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .