फलटण : पाडेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आज पाडेगाव उपकेंद्र येथे आर्सनिक अल्बम 30 गोळयांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लोणंद पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री संतोष चौधरी साहेब होते. या गोळयांचे वाटप चौधरी साहेबांच्या हस्ते आरोग्य कर्मचारी यांना देण्यात आले. कोरोनाच्या पाश्वभुमीवर चौधरी साहेब यांनी लोणंद पंचक्रोशीत उल्लेखनीय योगदान दिले असून या कार्यक्रमात कोविड योद्धा श्री संतोष चौधरी साहेब यांना सन्मानपत्र देऊन ग्रामपंचायतीच्या वतीने गौरविण्यात आले .कार्यक्रमासाठी सरपंच सौ स्मिता राजेश खरात उपसरपंच सौ वैशाली राजाराम भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य सौ मुक्ता नेवसे, सौ सुप्रिया ताम्हाणे, प्रियंका खरात श्री शेखरकाका खरात, राजेंद्र गोरे ,रोहिदासभाऊ पिंगळे, बिपिनदादा मोहिते राजेशभाऊ खरात,पत्रकार प्रशांत ढावरे तलाठी डी बी धायगुडे, ग्रामसेवक बळीप आण्णा, प्रभाकर नेवसे, आरोग्य विभाग कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर उपस्थित होते.