फलटण : फलटण शहर व ग्रामीण भागात आज तब्बल पंधरा रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत यामध्ये मलवडी येथे राहणाऱ्या २९ वर्षीय पुरुषाचा कोविड अहवाल *पाॅसिटीव्ह* आला आहे.( सारी पेशंट + मुंबई ट्रॅव्हल हिस्टरी) तर
खंडाळा तालुक्यातील पाॅसिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील मलटण ता फलटण येथील ३९ वर्षीय महिला पाॅसिटीव्ह आली आहे तर अलगुडेवाडी येथील पाॅसिटीव्ह व्यक्तीच्या निकट संपर्कातील १४ वर्षीय मुलगी कोविड पाॅसिटीव्ह आली आहे
रविवार पेठ, फलटण येथील पाॅसिटीव्ह व्यक्तींच्या निकट संपर्कातील ९ पुरुष/मुले (७, १२, २०, १६, ३८, ६८, ४३, ४०, ३२ वर्षे) व ३ महिला/मुली (१४, १४, २५ वर्षे) कोविड पाॅसिटीव्ह आले आहेत
असे एकूण १५ जनांचे रिपोर्ट पाॅसिटीव्ह आले आहेत अशी माहीती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली .